म्हसावद l प्रतिनिधी
बिरसा फायटर्स संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व राज्य कमिटी जिल्हा व तालुका कमिटी पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एका झूममिटिंग द्वारे बिरसा फायटर्स राज्य उपाध्यक्षपदी गणेश खर्डे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आधी नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत करत असताना चांगले प्रकार काम सुरू असताना आज राज्य कमिटी ने गणेश खर्डे यांचे कार्य बघून राज्य उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हा गणेश खर्डे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले व सांगितले की आदिवासी समाजाच्या अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिक्षण संस्कृती परंपरा समस्या सोडविण्यासाठी माझ्याकडून जेवढे शक्य असेल तेवढे मी सोडविण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले आहे.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी,आत्मसन्मानासाठी,अस् तित्व,अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त शिक्षण संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व आक्रमक संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा सरांनी बिरसा फायटर्स या आक्रमक संघटनेची निर्मिती केली आहे.
राज्याध्यक्ष मनोज पावरा,राज्य राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे, राज्य सचिव संजय दळवी,राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, राज्य प्रसिध्दी प्रमुख हसन तडवी, राज्य महानिरीक्षक व कोषाध्यक्ष दादाजी बागुल, नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, जिल्हाध्यक्ष भरत पावरा, प्रसिद्ध प्रमुख जालिंदर पावरा,तालुकाध्यक्ष संदीप रावताळे, तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी, कार्याध्यक्ष संतोष वळवी, सचिव राहुल पावरा, असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








