Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात सर्वाधिक १०.६१ लाख टन ऊसाचे गाळप, आयन कारखाना : हंगाम समाप्त

team by team
March 21, 2023
in राजकीय
0
जिल्ह्यात सर्वाधिक १०.६१ लाख टन ऊसाचे गाळप, आयन कारखाना : हंगाम समाप्त

नंदुरबार l प्रतिनिधी

तालुक्यातील समशेरपुर येथील आयान मल्टी ट्रेड साखर कारखान्याने १०.६१ लाख टन ऊसाचे गाळप करून हंगाम समाप्तीची घोषणा केली. जिल्ह्यातील कारखान्याच्या तुलनेत हे सर्वाधिक गाळप झाले आहे. साखर निर्मिती प्रक्रिया अजून दोन दिवस सुरू राहील, अशी माहिती आयान कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे यांनी दिली.

याबाबत श्री.सिनगारे यांनी सांगितले की, कारखान्याने गाळप हंगाम २०२२ २३ अंतर्गत दहा लाख ६१ हजार २७१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. हंगामातील पहिली उचल २३५० रुपये प्रति शेतकर्‍यांना अदा करण्यात आली. चालू हंगामातील ऊस गाळपापोटी आतापर्यंत शेतकर्‍यांना २०६ कोटी ५३ लाख रुपयेअदा करण्यात आले. साखर उतार्‍यावर एफआरपी नुसार उर्वरित देयक अदा करण्यात येईल.

शेतकर्‍यांचे ऊस उत्पादन वाढावे यासाठी बियाण्यात बदल करण्यात आला असून ठिबकचा वापर करणे तसेच अन्य मार्गदर्शन शेतकर्‍यांना करण्यात येत आहे. सुधारित जातीचे बियाणे पट्टा पद्धतीने लागवड करण्याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात येत आहे. यावर्षी पर्जन्यमानाचे विस्कळीत रूप पाहता साखर उतारा कमी मिळाला, गाळप ही कमी झाले. ही बाब लक्षात घेता आगामी कालावधीत नियोजन करण्यात येत आहे. शेतकर्‍यांनी ऊस लागवड करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

आयान कारखान्याला शेतकरी, ऊस उत्पादक, वाहतूकदार, कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचे सहकार्य लाभल्याचे यावेळी श्री.सिनगारे यांनी सांगितले. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक पद्माकर टापरे, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील, ऊस विकास अधिकारी माळी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेस पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मुंबईत भाजपात प्रवेश

Next Post

धडगाव : ऊसतोड मजुराचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

Next Post
धडगाव : ऊसतोड मजुराचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

धडगाव : ऊसतोड मजुराचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add