नंदूरबार l प्रतिनिधी
सन 2023- 24 या वर्षा साठी महाराष्ट्र विधान मंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची नियुक्ती विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्यात विधान परिषदेचे सदस्य आ. आमशा पाडवी यांची विधिमंडळाच्या अतिमहत्वाच्या अश्या समितींवर नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या विविध समित्यांवर सन 2023 -24 या वर्षासाठी सदस्य नियुक्त करण्यासाठी सदस्यांची शिफारस करण्यात आली होती, त्यानुसार विधान परिषदेचे सद्स्य आ. आमशा पाडवी यांची अनुसूचित जमाती कल्याण समिती व रोजगार हमी योजना समिती या महत्वाच्या समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल शिफारस केल्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व गट नेते आ.अनिल परब यांचे आभार मानले आहे. विधान मंडळाच्या महत्वाच्या समितींवर आदिवासी समाजातील बुलंद तोफ असलेल्या आ.आमशा पाडवी यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्यात आनंद व्यक्त होत आहे.








