नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील देसाईपुरातील पोरवाडवाडीत रक्तदान शिबिर आयोजकां प्रति कृतज्ञता व्यक्त करणेसाठी कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. मागील तीन वषार्पासून कोविड मुळे दरवर्षी होणारा सोहळा करता आला नाही .यावर्षी मागील तीन वर्षात ज्या शिबिर आयोजकांनी रक्तदान चळवळीस सहकार्य केले त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाच्या आयोजन केले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अस्थी रोग तंज्ञ डॉ. त्र्यंबक पटेल होते ,तर वक्ते म्हणून छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयाचे
विधिज्ञ अमरजीतसिंग गिरासे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शहादा येथील नेत्रतंज्ञ डॉ.वसंत पटेल ,जनकल्याण सेवा समिती चे अध्यक्ष डॉ.राजकुमार पाटील, प्रकल्प प्रमुख डॉ.सुधीर देसाई,भुपेंद्र शाह,अदि उपस्थित होते.
अॅड.गिरासे यांनी मार्गदर्शन करताना विश्वच्या तुलनेत भारतातील आरोग्य सेवेची परिस्थितीची मांडणी केली व भेडसावणा-या रक्त तुटवडयाची पूर्तता करण्यासाठी समाजात जनजागृती व देश तसेच देशबांधावाप्रति कर्तव्य भावनाची जाणीव करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले .जर एक टक्का लोकसंख्येने रक्तदान केले तरी आपण रक्त अभावी होणारे रुग्णांचे मृत्यू टाळू शकतो, हे आकडेवारी द्वारे समजून सांगितले.डॉ. त्र्यंबक पटेल यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या दानाचे तीन प्रकार पैकी रक्तदान हे सर्वोत्तम दान असल्याचे सांगून कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न ठेवता नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले. उपस्थित शिबीर आयोजक तसेच दहा वेळा पेक्षा जास्त वेळेस रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना स्मृतीचिन्ह भेट वस्तू व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
पिंपळनेरचे माधव पवार ,देवमोगरा शिक्षण संस्थेचे चेअरमन राजेंद्रकुमार गावित, रमाकांत पाटील यांनी शिबिर आयोजक म्हणून आपले अनुभव कथन केले .कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्प प्रमुख डॉ. सुधीर देसाई यांनी केले .यावेळी उपाध्यक्ष डॉ.भरत वळवी,संचालक चंदर मंगलानी,डॉ. भिकमचंद डागा डॉ. विशाल वळवी, सहसचिव प्रा.डॉ. राजेंद्र कासार, विजय कासार, आनंद रघुवंशी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजेंद्र कासार यांनी तर आभार आनंद रघुवंशी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश पारेख, डॉ. राजेश केस्वानी,डॉ.अर्जुन लालचंदानी व सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.