नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार काकर्दे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुंडलिक शंकर भापकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ए.डी. पानपाटील होते.
काकर्दे ता. नंदुरबार ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारी २१ रोजी झाली . निवडणुकीत खालील प्रमाणे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले.पुंडलीक शंकर भापकर, किरण शंकर मराठे,वैशाली प्रकाश माळी ,सुरेखा चंद्रसिंग पाडवी, कांतिलाल सदु भिल ,कलाबाई धनसिंग भिल ,हिराबाई युवराज माळी ,विमलबाई लाला महाजन , रेखाबाई राकेश माळी . अडीच अडीच वर्षाच्या फार्मूलामुळे सरपंच निवडणूक घेण्यात आली. पुंडलिक शंकर भापकर यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवडणूक अधिकारी पानपाटील यांनी जाहीर केले.
निवड बिनविरोध होण्यासाठी रविंद्र बागुल, तुकाराम माळी,फारुख खाटील, कन्हैयालाल माळी, राकेश माळी,नारायण मराठे,विठोबा माळी, प्रकाश महाजन, लोटन माळी,शांतीलाल मराठे, संतोष माळी, यांनी प्रयत्न केले. निवडणूक कामे निवडणूक कामी ग्रामसेवक सूर्यवंशी एन. डी. गायकवाड यांनी मदत केली.