म्हसावद l प्रतिनिधी
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या ताकद दिवसांगणिक वाढत आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील 18 लाख सरकारी कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. राज्य सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चे वर चर्चा निष्फळ ठरत आहे.
कर्मचारी सलग सात दिवसापासून बेमुदत संपावर ठाम आहेत. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सरकारी निम सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीही हे उत्स्फूर्तपणे सामील झालेले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी यांनी शासनाचा निषेध व्यक्त करत मुंडण आंदोलन जिल्हा परिषद समोरच सुरु केले आहे. सदर मुंडण आंदोलनाची सुरुवात जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत असलेले वरीष्ठ सहाय्यक डॉ. मंगेश वाघमारे यांनी केले.
तसेच जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती समोर शासनाचे निदर्शन हे थाळी नाद च्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. सदर आंदोलनात तालुक्यातील सर्व विभागाचे सर्व कर्मचारी हे स्वयंस्फूर्तिने सहभागी झालेले असल्याचे चित्र समोर दिसत आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना यांचा समन्वय साधत समन्वय समिती च्या नावे एक पत्रकच जाहीर करण्यात आले आहे. की 100 टक्के शाळा बंद म्हणजे बंदच अशा आशयाचे आवाहन करण्यात आलेले आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन चे जिल्हाध्यक्ष तथा समन्वय समिती सदस्य संदीप रायते यांनी दिली.








