म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजसेवी अलका विष्णू जोंधळे यांना सिने अभिनेते सुनील गोडबोले यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने नाशिक येथे बारा मार्च रोजी राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुष्परत्न बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शिक्षण साहित्य राजकारण समाजसेवा उद्योग क्रीडा संशोधन सांस्कृतिक कार्य कला यासारख्या विविध क्षेत्रातील 50 नामवंत महिलांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुष व महामातांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सिने अभिनेते सुनील गोडबोले अहमदनगर येथील आरटीओ इन्सपेक्टर जोतिलाल शेटे,पुष्परत्न सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.आनंद अहिरे, अडावदकर ज्वेलर्सचे, सुनील अडावदकर, सिने अभिनेत्री रूपाली पवार पुस्तकांच्या हॉटेलवाल्या आजी जोंधळे मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यानंतर विविध क्षेत्रातील नामवंत महिलांचा सन्मान करण्यात आला या राज्यस्तरीय पुरस्कार त्यासाठी एकूण 70 प्रस्तावातून नंदुरबार जिल्ह्यातून सौ. अलका विष्णू जोंधळे यांची निवड करण्यात आली सवाल का संदल यांनी नंदुरबार व शहादा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळातून ज्ञानदान केले आहे.
यासोबतच रमाई महिला मंचाच्या माध्यमातून महिला संघटन आणि प्रबोधन, हिरकणी जायंट्स सहेलीच्या माध्यमातून पर्यावरण ,स्त्री सक्षमीकरण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन रूजविणे, कालबाह्य रूढी, परंपरा यांच्या जोखडातून महिला मुक्ती, लोकमत सखी मंचाच्या माध्यमातून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व स्त्रियांमधील कला कौशल्यांना वाव देण्यासाठी व्यासपीठाची निर्मिती, दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सामाजिक व धम्मविषयक दिलेल्या योगदानाच्या आधारावर त्यांना हा पुरस्कार घोषित केल्याप्रमाणे प्रदान करण्यात आला.
त्यांच्या या उपलब्ध बद्दल जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई दीपक पाटील,माधवीताई पाटील ,प्रीतीताई पाटील एड संगीता पाटील रिताताई पाटील,प्रा. सुषमा मराठे ,डॉ. श्वेता अभिजीत चौधरी डॉ. संगीता कलाल अर्चना निकुंबे,मंजुषा गुलाले ,सुनिता उपगडे सुरेखा महिरे, वैशाली पवार प्रा कविता कुवर,मंदा रामराजे अंजली जैन आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.








