नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडाळी रस्त्यावर ६० हजार रुपये किंमतीची रोकड व कागदपत्रे चोरुन नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धुळे शहरातील साक्री रोडवरील मनोहरलाल मधुरादास मंधान हे शहादा तालुक्यातील वडाळी रस्त्यावरील मिनिरल वॉटरच्यापुढे ५०० मीटर अंतरावर अज्ञाताने त्यांच्याकडील ६० हजार २४० रुपये किंमतीची रोकड व ७ चेक तसेच २ रिसेट बुक, एक उधारीची वही व एक इस्टिमेट बुक असे कागदपत्रे चोरुन नेली.
याबाबत मनोहरलाल मंधान यांच्या पिर्यादीवरुन सारंगखेडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी करीत आहेत.