खेतिया l प्रतिनिधी
खेतिया (म.प्र.) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीचा शुभारंभ प्रशासक, अनुविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) सुमेरसिंह मुजाल्दे, बाजार समितीचे सचिव ओ.पी.खेडे यांच्या हस्ते पूजा अर्चना करून कापूस लीलावाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंडीच्या प्रांगणात व्यापारी, शेतकरी, हमाल, मापाडी ही उपस्थित होते. कापूस खरेदी सुरू होत आहे असे कळताच बाजार समितीमध्ये वाहनांची वर्दळ सुरू झाली. यामध्ये सर्वप्रथम कोठली, महाराष्ट्र येथील शेतकरी प्रशांत फकिरा यांच्या कापसाला प्रथम मुहूर्त सहा हजार पाचशे वीस रुपये (६,५२०) रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आला. बाजार समितीमध्ये एकूण आठ वाहने आली होती व कापसाची आवक चांगली होती. यावेळी बाजार समितीचे सचिव ओ.पी.खेड़े, खेतिया कॉटन असोसीएशनचे अध्यक्ष महिपाल नाहर, संचेती कोटेक्सचे दिलीप संचेती, आदित्य संचेती, मित्तल ग्लोबल कॉटन कमल अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, प्रांशय अग्रवाल, यश अग्रवाल, नानेश इंडस्ट्रीज सुनिल जैन, आशिष जैन, गोकुळ जिनिंग प्रविण शाह, अंकित शाह, दिविल कॉटन पंकज अग्रवाल, बालाजी कॉटन गजानन मालवीय, अमित मालवीय, हितेश सुराणा, नाकोड़ा एग्रो टेक राजेश नाहर, अमित नाहर, सौरभ नाहर, गोवर्धन कोटेक्स दीपेश हरसोला, प्रितेश हरसोला, दुर्गेश्वरी जिनिंग भीकमचंद जोशी, तिवारी जी, अंकित तिवारी, सत्यम जिनिंग मुकेश टाटिया, कमलेश मुकेश टाटिया आदि कॉटन व्यापारी उपस्थित होते व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मध्यप्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यातील शेतकऱ्यांची कापूस विक्री साठी खेतिया बाज़ारपेठ विश्वासू बाजार पेठ म्हणुन प्रसिद्ध आहे. शेतकरी वर्ग खेतिया बाजार समितीत कापूस विक्री साठी मोठ्या संख्येने येत असतात. खेतिया बाजार समितीच्या कापूस खरेदीच्या भावाकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष असते.
●खेतिया बाजार समितिमध्ये शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत असतो तरी शेतकरी बांधवांनी आपला कापूस व इतर शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समिती खेतिया येथे विक्री साठी आणावा असे आवाहन बाजार समिति सचिव- ओ.पी.खेड़े यांनी केले आहे.