नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील एका हायस्कूलजवळ असलेल्या झेरॉक्स दुकानातून नोटसची कॉपी काढून घेवून परीक्षार्थींना देण्यासाठी गेलेल्या १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर शहरातील एका हायस्कूमध्ये इयत्ता १० वीचा विज्ञान विषयाचा पेपर सुरु होता. यावेळी हायस्कूलजवळ असलेल्या एका झेरॉक्स दुकानातून इम्रानखान अख्तरखान पठाण, वसंत विरजी मावची, अमर दिनेश गावित, सुरेश मगन कोकणी, विश्वास रवीन गावित, रोहित शिवाजी गावित, दिलीप सोमजी गावितअजय किसन वसावे, मुकेश भोज्या वसावे, दिनकर दाविद गावित, नितेश मनीष गावित, व विशालन बंत्या गावित यांनी विज्ञान विषय पेपरच्या नोटसची कॉपी परीक्षार्थिंना पुरविण्याच्या उद्देशाने आढळून आले. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत नवापूर पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.