नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, माजी आ. शिरीष चौधरी मित्र मंडळ व डॉ. विक्रांत बाबा मोरे मित्र मंडळातर्फे भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीची सुरुवात शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील मोदी ग्राउंड वरून करण्यात आली.शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून तालुका क्रीडा संकुल च्या मैदानावर समारोप करण्यात आला .मोटरसायकल रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
यावेळी हाट दरवाजा परिसरात पुष्पवृष्टी करण्यात आली. रॅलीत शिवाजी महाराजांच्या जयघोष करण्यात आला.रॅलीमध्ये मोटरसायकलींसह भगवे झेंडे मोठ्या प्रमाणावर दिसून आले. रॅलीत सुमारे एक हजारावर मोटरसायकली सह युवक सहभागी झाले होते. जल्लोषात व उत्साहात मोटरसायकल रॅली काढण्यात आली.यावेळी मा.आ.शिरीष चौधरी, डॉ. विक्रांत मोरे आदी उपस्थीत होते.








