Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 6 अमंलदारांना दिली पदोन्नतीची भेट

team by team
March 9, 2023
in राजकीय
0
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांची नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 6 अमंलदारांना दिली पदोन्नतीची भेट

नंदूरबार l प्रतिनिधी

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अमंलदारांच्या कल्याणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. आज त्यांनी 6 अमंलदारांना दिली पदोन्नतीची भेट दिली.

 

नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांना सहा. पोलीस उपनिरीक्षक व पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्याची संकल्पना मांडली व तात्काळ मंत्रालयीन कर्मचारी यांच्याकडून किती पोलीस अंमलदारांना सहा.पोलीस उप निरीक्षक व पोलीस हवालदार पदावर पदोन्नती दिली जाईल ? याची माहिती घेतली.तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांना तात्काळ पदोन्नतीबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

 

 

मंत्रालयीन कर्मचारी यांच्याकडून पदोन्नतीची कार्यवाही करुन पदोन्नतीस पात्र असणाऱ्या 6 अमंलदारांना आज दि. 9 मार्च 2023 रोजी स्वत: पोलीस अधीक्षक यांनी त्यांचे दालनात उपस्थित राहण्याबाबत कळविले. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी त्या 3 पोलीस अंमलदारांना पोलीस हवालदार यांना सहा.पोलीस उप निरीक्षक या पदावर व 3 पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार या पदावर पदोन्नती झाल्याचे सांगताच त्या सर्व पोलीस अमंलदारांचा आनंद द्विगूणीत होवून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 3 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षक व 3 पोलीस नाईक पोलीस हवालदार या पदावर सेवा जेष्ठतेनूसार पदोन्नती दिलेली आहे.

 

 

पदोन्नती झालेल्या जिल्ह्यातील पोलीस अमंलदारांना पोलीस अधीक्षक यांचे दालनात एक छोटेखानी पण दिमाखदार कार्यक्रम आयोजित करुन पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी पोलीस अमंलदारांना सहा. पोलीस उप निरीक्षक पदाचे स्टार व पोलीस हवालदार पदाचे फित लावून पोलीस अमंलदारांचे अभिनंदन केले व पोलीस दलातील पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

पदोन्नती झालेल्या पोलीस अंमलदारांना पदोन्नती मिळाल्यानंतर मिळणारे वेतन व भत्ते याबाबत तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल. नंदुरबार जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच पोलीस अधिकारी व अमंलदारांच्या अडी- अडचणी व समस्या देखील वेळेवेर सोडविल्या जातील. तसेच गैर कायदेशीर कृत्य करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर.पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

 

यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) विश्वास वळवी, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले व पदोन्नती मिळालेले अंमलदार इत्यादी उपस्थित होते.

 

 

सहा. पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमंलदार

पोह सत्तार गणपत भिल ( पोलीस मुख्यालय नंदुरबार), पोह गुलाब बिहारी जोहरी ( अक्कलकुवा पोलीस ठाणे), पोह अशोक प्रभुदास वळवी ( धडगांव पोलीस ठाणे).

 

 

पोलीस हवालदार पदावर पदोन्नती झालेले पोलीस अमंलदार

पोना दिनेश कुसम्या गावीत ( नंदुरबार शहर पोलीस ठाणे) पोना दिलवरसिंग पेचरा पाडवी ( पोलीस मुख्यालय नंदुरबार), पोना गोपाल हिम्मतराव चौधरी ( स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार)

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आ.आमश्या पाडवी यांचे विधानभवनाच्या पायरी वर आंदोलन 

Next Post

नवापूर येथे शिवजन्मोत्सव साजरा

Next Post
नवापूर येथे शिवजन्मोत्सव साजरा

नवापूर येथे शिवजन्मोत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add