शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाच्या विद्यार्थ्यांनी दि.8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला सशक्तीकरण या विषयावर पथनाट्य सादर करून एक प्रेरक संदेश दिला.
औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादाच्या विद्यार्थ्यांनी ‘महिला सुरक्षा व सशक्तीकरण’ या विषयावर शहादा शहरात विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून बुधवारी जनजागृती केली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी आरोग्य व शिक्षण सभापती सौ.जयश्रीबेन (कांचनताई) दीपक पाटील, तहसीलदार डॉ .मिलिंद कुळकर्णी, पोलिस निरीक्षक राजन मोरे, पोलीस कर्मचारी युवराज पाटील,शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिलभाई पाटील, सचिव संजयभाई पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे माजी संचालक जयप्रकाश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती प्रतिमा माळी, डॉ.सोनिका पाटील, डॉ. दीपा पाटील, मंडळाचे शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार व पत्रकार राजेंद्र अग्रवाल, हिरालाल रोकडे, योगेश सावंत, मनोज बिरारी उपस्थित होते.
मान्यवरांनी सुरुवातीला दोंडाईचा रस्त्यावरील सप्तशृंगी मंदिर चौकात देवी सरस्वती व स्व.अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर रैलीला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला.शहरातील सप्तशृंगी मंदिर चौक, कृषी उत्पन्न बाजार समिति चौक, नगर पालिकाजवळ जनता चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली.
पथनाट्यातून सद्यस्थितीत महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्यात आला. महिलांवरील वाढत चाललेले अत्याचार तसेच समाजातील त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनावर भाष्य करण्यात आले.सर्वानी न्यायपालिकावर विश्वास ठेवावे. महिलांचा आदर मान सन्मान केला पाहिजे.आज असे एक ही क्षेत्र नाही की जिथे महिला अग्रेसर नाही, प्रत्येक क्षेत्रात महिला आपली कामगिरी बजावत आहे. पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून कार्य करीत आहेत. कोणतेही कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी आहे.
म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे. बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. आणि त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्म सन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहे. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये.आज अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, नेता, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या सर्वोच्च पदांवर देखील आहेत.
त्याचवेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देतांना मरतात, हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. तरुण युवा पीढ़ीने चांगले विचार धारण करावेत व महिलांचा मान – सन्मान,आदर केला पाहिजे. पथनाटयाचा शेवटी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली व त्यात सर्वानी महिलांचा आदर करणे, महिलांवर हल्ले करायचे नाही, चांगली वर्तनुक करायला हवी, कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ देणार नाही. सोचेगा इंडिया, समझेगा इंडिया, तभी तो बढेगा इंडिया असा संदेश विद्यार्थ्यांकडून पथनाट्याचा माध्यमातून देण्यात आला. समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सदर पथनाट्यसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. हेमंत सूर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रा.नेत्रदीपक कुवर यांनी मानले. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्यने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.