नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावात पोलिस शिपायास मारहाण करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील काठी गावात मालपाडा फाट्याजवळ पोशि.नाना गोरा पाडवी हे शासकीय कर्तव्य पार पाडत होते. यावेळी होळीच्या ठिकाणी वाहन घेऊन जाण्यास पोशि.नाना पाडवी यांनी अटकाव केला.
या कारणावरुन पोशि.नाना पाडवी यांना हिराजी अनिल पाडवी, अविनाश अनिल पाडवी व महेश छोटू पावरा यांनी कॉलर पकडून हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याबाबत पोशि.नाना पाडवी यांच्या फिर्यादीवरुन मोलगी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३५३, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक धनराज निळे करीत आहेत.