नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील कामोद गावात ॲपेरिक्षातून खाली पडल्याने सुरत येथे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ॲपेरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, एका ॲपेरिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षात (क्र.जी.जे. ०४ झेड १५३८) नितेश रमेश गावित (वय २७, रा.घिसलीपाडा ता.नवापूर) यांना बसवून कामोद ते खोकसा गावाच्या रस्त्याने जात होता. यावेळी ॲपेरिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ॲपेरिक्षा चालवून कामोद ग्रामपंचायतीच्या पुढे रस्त्यावर नितेश रमेश गावित हे ॲपेरिक्षातून खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
सुरत येथे उपचारादरम्यान नितेश गावित यारंचा मृत्यू झाला. अपघातानंतर ॲपेरिक्ष चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत रमेश वेस्ता गावित यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात ॲपेरिक्षा चालकाविरोधात भादंवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दिलीप गावित करीत आहेत.