नंदूरबार l प्रतिनिधी
8 मार्च जागतिक महिला दिवस सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला .चौपाळे येथील वनराई महिला बहुउद्देशीय विकास संस्थाच्या वतीने जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महिला दिनाचे औचित्य साधत सर्व महिलांच्या साडी चोळीं व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती माया माळसे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य जागृती मोरे, चोपाळे गावाच्या सरपंच सरला चौधरी, सामाजिक कार्यकर्ता सुलभा महिरे, ऍड प्रज्ञा वडनगरे ,ऍड सीमा खत्री, ऍड शुभांगी चौधरी, शोभा बारी ,वनराई महिला बहुउद्देशीय विकास संस्थेचे संचालक राणीताई गावित, उपाध्यक्ष रंजना गावित मीरा पाडवी, ललिता गावित रंजना वसावे लीनाताई रेखा गावित ,चौपाळे गावाचे पोलीस पाटील योगेश ठाकरे, ग्रा. प.सदस्य चंदर ठाकरे ,संतभूमी जनकल्याण समिती चौपाळे चे अध्यक्ष गणेश गिरासे ,विजय आत्माराम ठाकरे,योगेश शिंदे, सरदार पिंपळे ,दत्तात्रय कुमावत ,शिवनाथ पिंपळे रामेश्वर पटेल , कनीलाल वळवी, सुनील वळवी आधी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपल्या संभाषणातून महिला दिनाचे औचित्य पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राणीताई गावित यांनी केले यावेळी त्यांनी संस्थेच्या विविध कार्या बद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीरा पाडवी यांनी केले








