अक्कलकुवा l प्रतिनिधी
अक्कलकुवा येथील प्रतिष्ठीत व्यापारी महावीर राणूलाल भंसाली यांची मुलगी कु. प्रिया भंसाली हिने बी. एच. एम. एस. अंतिम परीक्षेत यश संपादित केलेले आहेत.
नूकतेच दिक्षांत समारंभात डॉ. प्रिया भंसाली हिचा डी. के. एम. एम. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर, यांच्यातर्फे पदवी प्रमाणपत्र देऊन सत्कार करून गौरविण्यात आलेले आहेत.भंसाली कुटुंबातून सी. ए., इंजिनीयर, एडवोकेट, व्यवस्थापन इतर क्षेत्रात सक्रिय असलेल्या सदस्यांसोबत डॉक्टर बनून कुटुंबाचे नाव उज्वल केलेले आहे. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनंदन होत आहे.








