नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौकात सोमवारी संध्याकाळी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थिनी व सुवासिनी महिलांच्या उपस्थितीत पावसाळी वातावरणातही वृक्षपुजनासह होलिकोत्सव साजरा करण्यात आला.गेल्या 33 वर्षापासून
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांच्या संकल्पनेतून पर्यावरणपूरक होळीचा उपक्रम सुरू आहे.मानाच्या बालाजी वाडा येथून गोपाल हिरणवाळे यांनी मशालद्वारे बालवीर चौकातील होळी प्रज्वलित केली.








