म्हसावद l प्रतिनिधी
शहादा शहरातील सिद्धीविनायक मंदिर या ठिकाणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शहादाच्या वतीने महाराष्ट्रातील क्रमांक २ ची भव्य दिव्य श्री राम नवमी निमित्त बैठक संपन्न झाली. त्या मिरवणुकीत वेगवेगळे देखावे ,झाकी दाखविण्यात येणार असून शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
त्याचबरोबर बैठकीत श्री राम नवमी मिरवणुक कार्यक्रमाच्या कार्यकारिणी गठित करण्यात आली असून अध्यक्षपदी -किरण भुला सोनवणेउपाध्यक्ष पदी- युवराज खेडकर,श्याम कुंभार सचीव- जगदीश पाटील अशी कार्यकारणी घोषीत करण्यात आली . यावेळी बैठकीत बजरंग दलाचे संयोजक लाला पाटील, जिल्हा गौ रक्षा प्रमुख राज साळी,प्रखंड संयोजक गुड्डू पवार ,प्रखंड मंत्री राधेश्याम निकम,जिल्हा आरती प्रमुख केशवजी पाठक,शहर गौ रक्षक ललीत पाटील,भाजपा शहर अध्यक्ष विनोद जैन,
जिल्हा उपाध्यक्ष दिनेश खंडेलवाल,रमाशंकर माळी,विक्की तांबोळी,पंकज सोनार,मनीष चौधरी,गोपाल गांगुर्डे,आत्माराम ठाकरे,प्रदीप चौधरी, शिवपाल जांगीड,अविनाश भोई,संजय साठे नगरसेवक,शुभम भावसार,अप्पु पाटील, भरत पाटील,किरण भोई, राजु माळी,एकनाथ चौधरी, शुभम चौधरी, कार्तिक नाईक, बाबा पानपाटील ,भुपेंद्र चौधरी, यश शिंपी, विजय लाडकर, कुणाल मोरे, विशाल वाडीले ,चेतन चौधरी, कुणाल भावसार, भुषण शिरसाठ, बीट्टू शिंपी आदी उपस्थित होते.








