शहादा l प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार आयोजित एक दिवसीय”छात्र संवाद” जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलन लोणखेडा.ता.शहादा येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात संपन्न झाले.
या संमेलनाचे उद्घाटन अध्यक्ष- पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळ, लोणखेडा दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून युवा उद्योजक मयूर दीपक पाटील,अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री नागेश गलांडे, प्रा. डॉ. राजेंद्र पाटील. (प्राचार्य- पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ महाविद्यालय, शहादा),शहर मंत्री श्री .स्वरूप लुंकड, जिल्हा संमेलन प्रमुख विनोद चव्हाण, जिल्हा प्रमुख प्रा. डॉ. दिनेश खरात उपस्थित होते.या संमेलनामध्ये अभाविप 75, नविन शैक्षणिक धोरण, विद्यार्थ्यांशी उद्योजकता परिसंवाद या विषयांवर भाषणे झाली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.संमेलनासाठी अभाविपच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.








