शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला,विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या संघाने राज्यस्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
चाळीसगाव जि. जळगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालय प्रश्नमंजुषा स्पर्धेत शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या वरिष्ठ महाविद्यालयीन संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. महाविद्यालयाच्या द्वितीय वर्ष विज्ञान वर्गातील विद्यार्थिनींच्या संघात कु. प्राजक्ता चिनावलकर, कु. धनश्री सोनवणे व कु. शितल सोनवणे यांचा समावेश होता.
तसेच कु.धनश्री सोनवणे या विद्यार्थिनीस स्पर्धेतील उत्कृष्ट स्पर्धक म्हणून पुरस्कार मिळाला. संघ व्यवस्थापक म्हणून प्रा . डॉ.प्रशांत जगताप यांनी सहभाग घेतला. विज्ञान प्रश्नमंजुषा संघाच्या यशाबद्दल मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा .मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के. पटेल आदींनी अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या विज्ञान मंडळ सदस्यांनी यशस्वी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.








