शहादा l प्रतिनिधी
अंधश्रद्धा आणि विज्ञान या दोन्ही परस्परविरोधी संकल्पना आहेत. अंधश्रद्धा ही व्यक्ती व समाजनिष्ठ असते तर विज्ञान हे वस्तुनिष्ठ असते,असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहादा शाखेच्या प्रधान सचिव सुवर्णा जगताप यांनी केले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त आयोजित ‘अंधश्रद्धा व विज्ञान’ या विषयावर त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील होते. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एम. के. पटेल,प्रा .डॉ. एस.के.तायडे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रशांत जगताप,प्रा. डॉ. अनिल बेलदार व सहकार्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .डॉ. महेश जगताप यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.









