नंदूरबार l प्रतिनिधी
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी राज्यभरामध्ये सुरु असलेल्या असहकार आंदोलना अंतर्गत दि. 2 मार्च पासुन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानावर दि.2 मार्च पासुन बेमुदत धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या आंदोलनात आंदोलन कर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पाठिंबा व्यक्त केला.व संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या रास्त मागण्यां विधान परिषदेत मांडणार असल्याचे आश्वासन दिले.यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्याध्यक्ष माया परमेश्वर, कार्याध्यक्ष युवराज बैसाणे,अमोल बैसाणे,सुधीर परमेश्वर,कान्हा नाईक,अक्कलकुवा तालुक्यातुन राजु पाटील आदी उपस्थित होते.यावेळी तालुक्यातील असंख्य अंगणवाडी कार्यकर्त्या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.