नवापूर | प्रतिनिधी
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी नगर करण्यात आले असून शहरातील भारतीय जनता पार्टी तर्फ संभाजी नगर नावाचे पाटी नवापूर एस. टी.आगारात चालक व वाहक यांना देण्यात आली.
नुकतेच राज्यातील शिंदे सरकारने औरंगाबादचे नाव संभाजी नगराची घोषना करुन अधिसुचना जाहीर केल्याने आज एस टी बसस्थानकावर जाऊन भाजपाच्या कार्यकत्यांनी नवापूर-संभाजीनगर नावाची पाटी चालक व वाहक यांना सुपूर्द केली.यावेळी भाजपा कार्यकत्यांनी घोषणाबाजी करीत केंद्र व राज्य सरकारचे आभार मानले.
यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष प्रणव सोनार,भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सदस्य निलेश प्रजापत, माजी नगरसेवक महेंद्र दुसाने,ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत जाधव,तालुका सरचिटणीस जयंती अग्रवाल, हर सरचिटणीस अजय गावीत,माजी नगरसेवक जैनु गावीत,शशहर सरचिटणीस सौरव भामरे,घनश्याम परमार ,भावीन राणा तोसिफ मंसुरी,अनिल सोनार,भिमसिग पाडवी,अलकेश मावची,श्याम गावीत आदी उपस्थित होते.