Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इयत्ता 10 वी व 12 वी साठीच्या परीक्षा केंद्र परिसरात प्रवेशास बंदी

team by team
September 16, 2021
in शैक्षणिक
0
नंदुरबार l प्रतिनिधी
 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोंबर 2021 पर्यंत उच्च माध्यमिक शालांत परीक्षा तसेच 22 सप्टेंबर  ते 8 ऑक्टोंबर 2021 पर्यत माध्यमिक शालांत परीक्षा घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार  परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.
 श्रीमती डी.आर हायस्कुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज नंदुरबार, वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा, न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु.कॉलेज अक्कलकुवा, श्रीमती पी.ए.सोढा सार्वजनिक हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय नवापुर अशा 4 उपकेंद्रावर इयत्ता 12 वी परीक्षा घेण्यात येणार आहे.
 यशवंत विद्यालय खोडाईमाता रोड, नंदुरबार व म्युनिसिपल न्यु इंग्लिश स्कुल, शहादा अशा 2 उपकेंद्रावर इयत्ता 10 वीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 16 सप्टेंबर ते 11ऑक्टोंबर 2021 या कालावधीत सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करु नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीत  बंद ठेवण्यात यावेत, असे ही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यात पोलीसांनी नष्ट केली गांजाची शेती, साडे चार लाखाचा गांजाची झाडे केली जप्त, एकाविरूद्ध गुन्हा

Next Post

नंदुरबार रेल्वे स्टेशनप्रवेशाद्वारा समोरील मार्ग दि. १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत बंद

Next Post

नंदुरबार रेल्वे स्टेशनप्रवेशाद्वारा समोरील मार्ग दि. १६ ते १९ सप्टेंबर पर्यंत बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add