नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा गावातील बाजार गल्लीत घरात जाऊन मारहाण करीत ५ हजार रुपयांची रोकड व ११ हजार रुपयाचे सोन्याची पोत काढून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा गावातील जितेंद्र वसंत चौधरी यांच्या घरात सुरेश भिका चौधरी, योगेश सुरेश चौधरी, नंदलाल शांतीलाल चौधरी, ललितचंद्र नंदलाल चौधरी, साधना सुरेश चौधरी व शितल योगेश चौधरी (सर्व रा.कोटला फळी ता.अक्कलकुवा) यांनी जितेंद्र चौधरी यांच्या घरी जाऊन काठी व हाताबुक्यांनी मारहाण केली.
तसेच जितेंद्र वसावे यांच्या खिशातून ५ हजाराची रोकड ११ हजार रुपये किंमतीची दोन तोळे सोन्याची पोत काढून घेत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जितेंद्र चौधरी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम ३९५, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक देविदास वडगुले करीत आहेत.