नंदूरबार l प्रतिनिधी
शहरातील चिराग गल्लीत घराच्या दरवाजावर दगडफेक करीत दुचाकीसह वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील चिराग गल्लीत शेख रफिक शेख अजीज यांच्या घराच्या दरवाजावर साबीर शेख आरीफ बिस्ती, मोहंमद जाकीर मोहंमद बिस्ती, काजीम मलीक नाजीम मलीक यांनी दगडफेक केली. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनावर दगडफेक करीत नुकसान केले. तसेच शोख रफिक शेख अजीज यांना जिवेठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत शेख रफिक शेख अजीज यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३३६, ४२७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.प्रकाश अहिरे करीत आहेत.