धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कंज्यापाणी येथे ज्वारी पिकात लागवड केलेली गांजाची शेती स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाने नष्ट केली असून कारवाईत ४ लाख ५३ हजार ३२० रुपये किमतीचे ६४ किलो वजनाचे गांजाचे झाडे पोलीसांनी जप्त करीत शेत मालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धडगाव तालुक्यातील येथे शिलदार फाड्या पावरा मु . कंज्यापाणी पोस्ट काकडदा ता . धडगांव ( अक्राणी ) यांच्या कंजापानी गावाच्या शिवारात असलेल्या शेतात ज्वारी पिक गांजाच्या रोपांची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग नंदुरबार व पोलीस स्टेशन धडगाव यांच्या संयुक्त कारवाईत ४ लाख ५३ हजार ३२० रुपये किमतीचे ६४ किलो वजनाचे गांजाचे झाडे पोलीसांनी जप्त करीत शेत मालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार येथील पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सपोनि संदीप पाटील , अनिल गोसावी , पो . हवालदार दीपक गोरे , रवींद्र पाडवी , पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव यांचे पथक व धडगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे , पोलीस हवालदार राजेंद्र जाधव , विनोद पाटील , राजेश्वर भुसलवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली .