Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारीणी बरखास्त,जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी याबाबत सांगितले कारण

team by team
February 28, 2023
in राजकीय
0
नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारीणी बरखास्त,जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी याबाबत सांगितले कारण
नंदुरबार  l प्रतिनिधी
राज्य पातळीवरुन संघटनात्मक जबाबदारी म्हणून क्रियाशील कार्यकर्त्यांची नोंदणी करण्याचे आदेश प्राप्त झाले होते. मात्र यात शहर कार्यकारीणी सपशेल अपयशी ठरल्याने राज्य पातळीवरुनच सुचना प्राप्त झाल्याने नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारीणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार शहरातील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी डॉ.मोरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी राष्ट्रवादी संवाद यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी संघटनात्मक कार्यावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. दरम्यान, जिल्हाभर राष्ट्रवादीच्यावतीने संघटन मजबूत करण्यासाठी क्रियाशील सदस्यांची नोंदणी करण्यावर भर देण्यात आला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटनात्मक बांधणीला महत्व असल्याने यात प्रदेश पातळीवरुन देखील सूचना प्राप्त झाल्या होत्या. मात्र नंदुरबार शहर राष्ट्रवादीच्या कार्यकारीणी क्रियाशील सभासदांच्या नोंदणीत अपयशी ठरली. यामुळे प्रदेश पातळीवरुन प्राप्त सुचनेनुसार नंदुरबार शहर राष्ट्रवादीची कार्यकारीणी बरखास्त करण्यात आल्याचे डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, पक्षात संघटनाला महत्व आहे.
मात्र या बाबींकडे कोणीही पदाधिकारी दुर्लक्ष करत असेल तर त्यांनी स्वत:हून पदत्याग करावा व काम करणाऱ्यांना संधी द्यावी. कार्यकारीणी बरखास्त करण्याचा निर्णय प्रदेश पातळीवरुन प्राप्त सुचनेनुसार घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष कमलेश चौधरी, प्रकाश भोई उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्वच पालिकांच्या निवडणूका आगामी कालावधीत होणार आहेत. अद्याप याबाबत कोणतेही निर्देश नसले तरी आतपासून सदर निवडणूका डोळ्यासमोर ठेवून संघटनावर भर दिला जात आहे. दरम्यान, पालिका निवडणूक महाविकास आघाडीसोबत लढणार आहोत. यात यश न आल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढण्यास देखील सज्ज असल्याचे डॉ.अभिजीत मोरे यांनी स्पष्ट केले.
बातमी शेअर करा
Previous Post

संत निरंकारी मिशनतर्फे शिवण नदीची स्वच्छता

Next Post

मोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

Next Post
मोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

मोग्राणी येथे आगीत दोन घरे जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add