नंदूरबार l प्रतिनिधी

समशेरपुर येथील आयान शुगर,(साखर शाळा) ऊस तोडणी मजुरांचे मुलांसाठी सुरू केलेल्या साखर शाळेला जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी भेट दिली. शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले. स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
स्थलांतरीत ऊस तोडणी मजुरांची मुले शिक्षणापासुन वंचित राहत होती. त्यासाठी आयान कारखान्याने 2021 पासुन कारखाना साईटवर व प्रकाशा येथे साखर शाळा सुरू केली. कारखान्याचे जनरल मॅनेजर पद्माकर टापरे व शेतकरी अधिकारी ए.आर.पाटील, लेबर ऑफीसर गोविंद भगत यांनी श्रीमती खत्री यांचे स्वागत केले आणि शाळेबाबत माहिती दिली.
रामदास पाटील व त्यांचे सहकारी साखर शाळा चालवत असुन या साखर शाळेत पहिली ते पाचवीचे एकुण 325 विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत असुन त्यांना रोज शिक्षणासोबत कला, खेळ इ.चे देखील ज्ञान दिले जाते. सोबतच रोज खाऊ वाटप केले जाते. सदर साखर शाळेस जिल्हाधिकारी श्रीमती.मनिषा खत्री मॅडम यांनी भेट दिली असुन कारखान्याचे कौतुक देखील केले.
साखर शाळेचा सन -2022-23 चा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यास विद्यार्थ्यांचा कार्यक्रमास अतिशय चांगला उत्साह दिसून आला. त्यांना पारितोषिके देण्यात आली. जेवन देण्यात आले. या वेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर पद्माकर टापरे, शिक्षण विस्तार अधिकारी जयवंत चोवरे, केद् प्रमुख सुरेश वानखेडे, शेतकी अधिकारी ए.आर.पाटील व कारखान्याचे अधिकार व कर्मचारी , ऊस तोडणी मजुर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी व साखर शाळेसाठी रामदास पाटील व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले. त्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला व वंचित ऊस तोडणी मजुरांचे मुलांचे शिक्षणाची सोय केली त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले त्या बद्दल आयान कारखाना प्रशासनाचे कौतुक केले.









