नंदुरबार l प्रतिनिधी –
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, जिल्हा परिषद नंदुरबार,पंचायत समिती नंदुरबार, एन एस इ फौंडेशन व फिनिश सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह च्या सभागृहात शाश्वत स्वच्छता या विषयावर स्वच्छाग्रही/वॉश चॅम्पियन यांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात शाश्वत हागणदारीमुक्तीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ.वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहेत.या अनुषंगाने नंदुरबार तालुक्यात गट विकास अधिकारी महेश वळ्वी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील स्वच्छाग्रहीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात ग्रामीण भागात शाश्वत हागणदारी मुक्ती राहावी यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जाणीव-जागृती पर विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर एनएसई फाउंडेशन, जिल्हा परिषद, पंचायत समिती नंदुरबार, फिनिश सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत स्वच्छता व हगणदारी याविषयी स्वच्छाग्रहीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामस्थ यांची भूमिका, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन सहाय्यक गटविकास अधिकारी एल.जे.. पावरा , मुख्य प्रशिक्षक शिवकुमार शर्मा, प्रकल्प व्यवस्थापक आकांक्षा बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्षमता बांधणी समन्वयक मंगेश निकम यांनी शाश्वत स्वच्छता अभियान याची माहिती देत उघड्यावरील हागणदारी मुक्त ग्रामपंचायत यामधील लोकांचे योगदान ,शाश्वत उघड्यावरील हगणदारी मुक्त गाव या प्रकल्पाचे उद्दीष्ट यावर मार्गदर्शन करून विविध उपाय योजना यावर संवाद साधला. प्रशिक्षक शिवकुमार शर्मा यांनी उपस्थित स्वच्छाग्रही/वॉश चॅम्पियन यांना ग्रामपंचायत हागनदारी मुक्त करण्यासाठी लोकांससाधावायच्या संवादा बाबत मार्गदर्शन करताना उघड्यावरील हागनदारी चे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन करून शौचालय वापराबाबत मानसिकतेत बदल आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. . कार्यशाळेस प्रितेश्वर पाटील (बीआरसी),अर्जुन कडवे (सीआरसी) नितिन महानुभव, निशांक गजभिये, संतोष नगारे, अभिजीत मैदाड, अनिल पवार, विजय गावीत, राकेश गुरव, वैभव खांडवी, सुनीता भोये, मारोती चिमनकर, किशोरी शेवाळे, नीलेश पगारे, दारासिंग पावरा आदी.उपस्थित होते.