शहादा l प्रतिनिधी
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून शहादा तळोदा विधानसभेचे आ. राजेश पाडवी, निझर (गुजरात) विधानसभेचे आ. डॉ. जयराम गामीत, महाविद्यालाचे माजी विद्यार्थी व एआईक्युरिस अँटीइन्फेक्टीव क्युअर्स जर्मनीचे संचालक डॉ. योगेश्वर बच्छाव, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक रमाकांत पाटील, बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, सुरत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिलीप पाटील, अखिल भारतीय गुर्जर महासभेचे गुजरात राज्याचे कार्यकारी अध्यक्ष जगदीश पटेल, शहादा भाजपा शहर अध्यक्ष विनोद जैन, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, प्राचार्य डॉ. एन.जे. पाटील, प्राचार्य बी.के.सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, शिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांनी सर्वांचा आदर मान सन्मान करणे आवश्यक असून औषधनिर्माणशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना खूप चांगले भविष्य आहे. व्यवस्थितरित्या अभ्यासक्रम पूर्ण करून आपण आपले जीवन चांगले बनवू शकतात. तसेच विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांनी व्यवस्थितरित्या अभ्यास करत शिक्षण पूर्ण करून शिक्षक म्हणून कार्य करू शकतात.त्याचप्रमाणे शिक्षण घेत असतांना इतर क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम ह्यामध्ये भाग घेऊन कला कौशल्य दाखवू शकतात.विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी केले.
क्रीडा विभागप्रमुख प्रा.हितेंद्र चौधरी, प्रा.गिरीश बडगुजर यांनी क्रीडा विभागाच्या अहवालाचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अमित धनकानी यांनी केले तर आभार प्रा.डॉ.एच.पी.सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.