नंदुरबार l प्रतिनिधी-
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलची प्रवेशपूर्व परीक्षा रविवार 26 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सदर प्रवेश पूर्व परीक्षा रविवार 26 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 ते 1-00 या वेळेत तळोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळा अलिविहीर ता.अक्कलकुवा येथे होईल. तर धडगांव तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता शासकीय आश्रमशाळा, सलसाडी ता.तळोदा तसेच अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता शासकीय आश्रमशाळा तालंबा, ता. अक्कलकुवा या परीक्षा केंद्रावर होईल.
परीक्षेस विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे शासन प्रमाणित ओळखपत्र किंवा आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. पर्यवेक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. कोणताही विद्यार्थी परीक्षा देतांना गैरप्रकार करतांना आढळल्यास विद्यार्थ्यांला परीक्षेस अपात्र करण्यात येईल, असे एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी कळविले आहे.