नंदूरबार l प्रतिनिधी
गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी बेडकी चेक पोस्ट ता.नवापूर येथे ५०० रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी खाजगी पंटर सह मोटार वाहन निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. सदरची कारवाई नाशिक येथील पथकाने केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे ट्रक चालक असून गुजरात मधून महाराष्ट्र राज्याच्या हद्दीत ट्रक सह प्रवेश करण्यासाठी खाजगी पंटर विजय मगणं माऊची याने कागदपत्रे ओके असताना देखील तक्रादार यांच्याकडे 500 रुपयांची ची मागणी करून तिचा स्वीकार केला व मोटार वाहन निरीक्षक महेश हिरालाल काळे रा.नाशिक
यांनी खाजगी इसमास लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.आज दि.२२ फेब्रुवारी रोजी 500 रुपयांची लाच घेताना विजय मगणं माऊची याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी विजय मगणं माऊची, महेश हिरालाल काळे रा.नाशिक यांच्या विरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक साधना इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. प्रफुल्ल माळी,पो. हवा. प्रकाश डोंगरे यांच्या पथकाने केली आहे.