नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा रस्त्यावरील आमलीबारी गावाजवळ ट्रॅक्टरने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळगव्हाण येथील आपसिंग खाअल्या तडवी हे अक्कलकुवा रस्त्याने पायी जात होते. यावेळी एका ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात चालवून आमलीबरी गावाच्या पुढील वळण रस्त्यावर आपसिंग तडवी यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत सकुबाई आपसिंग तडवी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/ १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर करीत आहेत.