Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महसूल विभागातर्फे पायाभूत प्रशासकीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

Mahesh Patil by Mahesh Patil
February 22, 2023
in राज्य
0
महसूल विभागातर्फे पायाभूत प्रशासकीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

नंदुरबार येथील जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत महसुल विभागातील तलाठयांसाठी आयोजित पायाभूत प्रशासकीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन  निवासी उपजिल्हाधिकारी, सुधीर खांदे, यांचे हस्ते करण्यात आले.

 

याप्रसंगी रो.ह.यो. उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा प्रशासकीय. प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, डॉ. जगराम भटकर, महसूल तहसिलदार डॉ.उल्हास देवरे,प्रा.रमेश चौधरी उपस्थित होते. राज्य प्रशिक्षण धोरण अंतर्गत विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, यांचे
निर्देशान्वये सा. प्र. वि. मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णयानुसार शासनसेवेत सन 2011 पासून दाखल झालेले तलाठी कर्मचारी यांचेसाठी नियुक्तीनंतरचे पायाभूत प्रशासकीय प्रशिक्षणाचे पहिल्या सत्राचे आयोजन दिनांक 20/02/2023 ते 03/03/2023 या कालावधीसाठी करण्यात आले. सदर प्रशिक्षण हे जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नंदुरबार येथे आयोजित केले असून यासाठी पहिल्या सत्रात एकूण 60 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

 

 

यां प्रशिक्षण कालावधीत केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम,व महाराष्ट्र लोकसेवा हक्क बाबत तळोदा प्रकल्पचे गोंविदा साळुंके,अभिलेख वर्गीकरण व्यवस्थापन व विभागीय चौकशी बाबत जिल्हा परिषदेचे वरीष्ठ सहायक मनोज अहिरराव,राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व पदग्रहण अवधी,स्वीयेतर सेवा,निलंबन,बडतर्फी काळात करावयाची प्रदाने नियम 1981,नागरी सेवा वर्तणूक,शिस्त व अपिल,महाराष्ट्र नागरी सेवा बाबत वेतन व भविष्य निर्वाहचे लेखा अधिकारी दिपक धनगर,सामुहिक हानी व्यवस्थापन बाबत शहर पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर,फेरफार नोंदी संदर्भातील कार्यवाही,स्थळ निरीक्षण,पंचनामे,जबाब,ई-पीक पाहणी बाबत नायब तहसिलदार नितीन पाटील,वेळेचे व्यवस्थापन,सर्जनशिलता व समस्या निराकरण, संवाद कौशल्य,अनभिज्ञ खेळ याबाबत प्राचार्य डॉ.जगराम भटकर,न्यायालयीन प्रकरणाचे परिच्छेदनिहाय अभिप्राय मॅट,लोकआयुक्त,उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाबाबत विधी अधिकारी दिपाली कलाल,वर्ग 1 व 2 च्या जमीनीबाबत करावयाची कार्यवाही व पोटखराब लागवडीखाली आणणेबाबत जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर,

कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा लैगिंक छळास प्रतिबंध,मनाई,निवारण बाबत जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी राजेंद्र बिरारी,शासकीय वसुली व जमाबंदी,दप्तर तपासणी व गांव नमुने 1 ते 21 बाबत अक्कलकुवा तहसिलदार रामजी राठोड,रोखवही व अनुषगीक बाबी महालेखापाल कार्यालयाचे परीक्षण बाबत कोषागार अधिकारी योगेश पगारे,निवडणूक कामकाजाबाबत उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे,रक्तदानाचे महत्व यावर ब्लड बॅकेच्या डॉ.रमा वाडीकर,म.ज.म.अ.1966 चे कलम 85/49 नैसर्गिक आपत्ती व टंचाई कालावधीतील कामकाजाबाबत तळोदा तहसिलदार गिरीष वखारे,सातबारा संगणकीकरण,ई-चावडीबाबत शहादा तहसिलदार डॉ.मिलींद कुलकर्णी,ई-फेरफार तांत्रिक तरतुदीबाबत नवापुर तहसिलदार मंदार कुलकर्णी,म.ज.म.अ.1966 मधील सुधारणा बाबत महसुल तहसिलदार डॉ.उल्हास देवरे,पुरवठा विषयक कामकाजाबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार,क्षेत्र भेट तलाठी सजा,मंडळ अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाचा दौरा बाबत निवासी नायब तहसिलदार भिमराव बोरसे,

भूसंपादन प्रक्रिया बाबत रोहयो उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे,खाजगी जमीनीवरील अतिक्रमण कलम138 बाबत नायब तहसिलदार राजेश अमृतकर,फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम 107,109,110,145,148,इ.मधील प्रतिबंधक कार्यवाही बाबत नंदुरबार तहसिलदार भाउसाहेब थोरात,सामाजिक अर्थसहाय योजना बाबत संगायो.चे तहसिलदार डॉ.सुरेश कोळी हे मार्गदर्शन करणार आहेत.

 

 

पथनाटय सादरीकरणाबाबत विषय सहायक देवेंद्र बोरसे तर प्रत्येक दिवशी सकाळी प्रशिक्षणार्थीचा योगाभ्यास शिक्षण विस्तार अधिकारी वसंत पाटील घेणार आहेत विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली सदरचे प्रशिक्षण जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आले असून सदर प्रशिक्षण कार्यक्रम तयार करणे व प्रशिक्षण आयोजित करणेकामी जि.प्र.प्र.सं.अधिव्याख्याता डॉ. संदिप मुळे,नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी, अव्वल कारकुन गोकुळ पाटील यांनी प्रशिक्षण कामी नियोजन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अरे तुला ओळखलेच नाही : ५२ वर्षांनी एकत्र आले डी. आर.विद्यालयाच्या १९७१ चे विद्यार्थी

Next Post

डामरखेडा गावाजवळ अपघात, २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

डामरखेडा गावाजवळ अपघात, २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025
जिल्हा पोलीस सायबर सेलने 34 लाख तक्रारदारांना केले परत

जिल्हा पोलीस सायबर सेलने 34 लाख तक्रारदारांना केले परत

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group