नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे शिव जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिवसांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शिव जन्मोत्सव समिती, जि.प. शाळा काकरदे, तसेच क .पु. पाटील माध्यमिक विद्यालय भालेर इ. हे कार्यक्रमाचे आयोजक म्हणून होते. कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून भास्करराव पाटील तसेच अध्यक्ष म्हणून प्रकाश महाजन होते. या वेळी चंद्रशेखर पाटील,वैशाली महाजन, रविंद्र बागुल, दत्तात्रेय खलाने, पुंडलिक मराठे, निंबा मराठे, कन्हैयालाल माळी, फारूख कुरेशी, भटु सोनार, रविंद्र मराठे, हंसराज माळी, शांताराम मराठे, सुरेश मराठे, तुकाराम माळी, फकिरा पाटील, देविदास खलाने, कृष्णा पाटील, गोरख मराठे, कांतीलाल ठाकरे,रामचंद्र हिरे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या वेळी कार्यक्रमाचा प्रारंभ हा शिव प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आला. शिवइतिहासातील प्रसंगावर आधारित नाटिका, शिव गीतांवर – राष्ट्रप्रेमावरील व सांस्कृतिक गितावर नृत्य, तसेच कविता , चारोळ्या वाचन, मनोगत – व्याख्यान इ.कार्यक्रमाचे स्वरूप होते. या वेळी ग्रामस्थांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण दिसून आले. जय जिजाऊ जय शिवराय- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते.
कार्यक्रमाच्या प्रस्तावनेचे वाचन निखिल पाटील व सुत्रसंचलन व्ही.व्ही इशी तसेच आभार प्रदर्शन भटु आनंदा माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण मराठे (उप संरपंच) राकेश माळी (मनसे तालुकाध्यक्ष) सोपानदेव कोळी, विठोबा माळी, भरत खैरनार, संजय माळी, प्रमोद मराठे, अंकुश जगदेव, युवराज खैरनार,पुरूषोत्तम हिरे, हेमंत माळी , नारायण मराठे, जितेंद्र भंवर, दशरथ वाघ, ज्ञानेश्वर खलाने, जितेंद्र माळी, दिनेश मराठे, पंकज भापकर, कल्पेश माळी कमलेश ठाकरे, अरविंद माळी, व शिव जन्मोत्सव समिती च्या युवकांनी विशेष परिश्रम घेतले.