अक्कलकुवा l प्रतिनिधी
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स (आयसीएआय) संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सी.ए. अंतिम परीक्षेत क्षितिज मनोज भंसाली यांनी यश मिळविले आहे.
सदर परिक्षेत देशभरातून दोन गटातून सुमारे २९ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील केवळ ११ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यांनी इंटरमिजिएट तसेच अंतिम परीक्षेत दोन्ही गटातून यश संपादित केले आहे. क्षितिज भंसाली हा अक्कलकुवा तालुक्यातून सी.ए. परीक्षा उत्तीर्ण होणारा पहिलाच विद्यार्थी आहे.
तो श्री. जैन श्वेतांबर मुर्तीपूजक संघाचे मा. अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार, प्रतिष्ठित व्यापारी जीवनलाल भंसाली यांचा नातू तसेच प्रतिष्ठित व्यापारी मनोज भंसाली यांचा मुलगा आहे. भंसाली कुटुंबातून डॉक्टर, इंजिनियर, एडवोकेट, व्यवस्थापन इतर क्षेत्रात सक्रिय असलेल्या सदस्यांसोबत सी.ए. बनून कुटुंबाचे नाव उज्वल केलेले आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अभिनंदन होत आहे.