धडगाव l प्रतिनिधी
तालुक्यातील भूजगाव ग्रामपंचायत परिक्षेत्रातील येणारे हरणखुरी व भुजगाव गावात गरोदर माता,स्तनदा माता आणि SAM बालकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. समता फौंउडेशनच्या सहकार्याने औषोधपचार करण्यात आले. या उपक्रमाचे दोन्ही गावातील गरोदर माता,स्तनदा माता आणि कुपोषित बालकांनी याचा लाभ घेतला.
या आरोग्य तपासणी अंतर्गत गावातील 28 गरोदर माता, 24 स्तनदा माता आणि 25 कुपोषित बालकांची तपासणी आणि औषोधपचार करण्यात आले. मागील आठवड्यात हरणखुरी व भूजगाव गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणी आणि गावकऱ्यांची मधुमेह आणि रक्तदाबाची चाचणी करण्यात आली होती. खुंटामोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ.मालती ठाकरे, सीएचओ निलेश परमार, एल.एस.ओ दीपक मंगावकर, एएनएमव डी.व्ही.परमार,सीपी तोरडे, एमपीडब्लू देवराम वळवी उपस्थित राहिले. तर ग्रामपंचायतीचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहिले. ग्रामपंचायत स्तरावरून आरोग्याची काळजी घेत असल्याने ग्रामपंचायतीचे कौतुक केले जात आहे.
भूजगाव ग्राममपंचायत परिक्षेत्रातील गरोदर माता,स्तनदा माता आणि कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषोधपचार कारण्यात आले, समता फौंऊडेशनच्या सहकार्याने आयोजित केले गेले. अश्या शिबिराच्या माध्यमातून गावाचे आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केले जात आहे
अर्जुन पावरा, सरपंच ग्रामपंचायत भुजगाव.