नंदुरबार l प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अर्थात ओम शांती परिवारातर्फे आयोजित महाशिवरात्रि महोत्सवाचा समारोप प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आला.
महाशिवरात्रीला जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गुरुनानक मंगल कार्यालयात आयोजित केदारनाथ शिवलिंग दर्शन आणि लेझर शो कार्यक्रमास गेल्या दोन दिवसात हजारो भाविकांनी हजेरी लावली. नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील, पत्रकार वैभव करवंदकर आणि मीडिया विंगचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे यांच्या हस्ते ओंकारेश्वर महादेवाची आरती करण्यात आली.
बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर आणि डॉ. भगवान पटेल,दिनेश साळुंखे यांनी प्रसारमाध्यम प्रतिनिधींचा सन्मान केला. यावेळी केंद्राच्या संचालिका विजयादिदि,उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीके योगिता दीदी यांनी केले.आभार बिके वर्षा दीदी यांनी मानले.
याप्रसंगी आलेल्या शेकडो भाविकांना प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्रीचे महत्त्व सांगण्यात आले.सलग तीन दिवस आयोजित कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जयचंद नगर मुख्य शाखा आणि सिंधी कॉलनी उपकेंद्राच्या बंधू भगिनी साधकांनी परिश्रम घेतले.