नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे संजय राऊत यांना यांच्यावर बोगस गुन्हे दाखल करून त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या शिंदे फडवणीस सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात आज निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तसेच पुढील काळात उद्धव साहेबांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना अशा प्रकारे होणाऱ्या अडचणी निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रात व जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडून त्यांच्या निषेध करण्यात येईल अशी माहिती नगर प्रमुख पंडित माळी यांनी दिली. यावेळी निवेदन देताना युवा सेना जिल्हा प्रमुख अर्जुन मराठे, विजय ठाकरे, विजय छोटू चौधरी, दिनेश भोये, धीरज घाटे, नंदा पाटील, धाकू कोळी, ह्याच्या सह्या आहेत. अशाप्रकारे बे जबाबदारीने सरकारमध्ये वावरणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले