शहादा l
येथील सन्मित्र बहुउद्देशीय क्रीडा मंडळातर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कृषी भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुतळ्याचे व प्रतिमाचे पूजन आणि माल्यार्पण पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील व सौ. माधवीबेन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानी कुलकर्णी,अजय शर्मा, रमेश जैन, के.के.सोनार, रमेश महाले,नेत्रदीपक कुवर, आर. टी. पाटील,प्रमोद मोरे,चतुर पाटील,रमाशंकर माळी,शिवपाल जांगिड, प्रशांत कदम, हृदयेश कुंभार,दिपक बोर्डे,गणेश पाटील,आणि शहादा शहरातील अनेक शिवप्रेमी नागरीक, लेखक, कवी, प्रतिष्ठित व्यक्ती, पत्रकार,व्यावसायिक, युवा कार्यकर्ते यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्ध पुतळा पूजन करून विनम्र अभिवादन केले .सुत्रसंचालन ज्ञानी कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन के.के.सोनार यांनी केले.