Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला विरोध जातीयवादातून

team by team
February 19, 2023
in राजकीय
0
अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला विरोध जातीयवादातून

नंदूरबार l प्रतिनिधी

‘श्री समर्थ संप्रदाया’चे सर्वेसर्वा तथा पद्मश्री पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाने वर्ष 2022 चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आहे; खरे तर या पुरस्काराने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची उंची वाढलेली आहे. असे असतांना त्याला काही जातीयवादी संघटनांनी विरोध केला आहे. पूजनीय अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे समाजसेवेचे कार्य पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. कोकणात त्यांनी व्यसनमुक्ती, स्वच्छता, सदाचार शिकवून लाखो लोकांना सन्मार्गाला लावले आहे. ‘दासबोधा’च्या शिकवणीतून अनेक सुसंस्कारित पिढ्या घडवल्या आहेत. अशा थोर विभूतीला ज्यांचा इतिहास केवळ तोडफोड आणि धमक्यांचा आहे, तसेच समाजहिताचे कोणतेही कार्य नाही अशा संघटनेने विरोध करणे, हे हास्यास्पद आहे. अशा द्वेष आणि जातीयवाद पसरवणार्‍यांचा बंदोबस्त महाराष्ट्र शासनाने करावा, *अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला विरोध करणार्‍या संघटनांनी राज्यात आतापर्यंत केवळ जातीयवादच पसरवला आहे. असाच विरोध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाल्यावर झाला होता. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची निवड ही संबंधित व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करून शासकीय निवड समितीद्वारे केली जाते. पूज्य धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिल्याने कोकणातील ‘शेकाप’, ‘शिवसेना’, ‘भाजप’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ आदी सर्व पक्ष तथा सामाजिक संघटनांनी त्यांचे मनापासून स्वागत केले आहे. पूज्य अप्पासाहेब धर्माधिकारी हे दासबोध आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या विचारांचा प्रसार करतात, हे खरे विरोधाचे कारण आहे. जातीभेद मिटवण्याचे कार्य करणार्‍या संतांना ‘वर्णभेद आणि अंधश्रद्धा पसरवणारे म्हणणे’, हा सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. देशभरात विविध सिने क्षेत्रातील नट-नट्यांना पुरस्कार जाहीर होतात. त्यांतील काहींवर तर गंभीर गुन्हे वा आरोपही असतात. तेव्हा ही मंडळी कुठे जातात? त्यामुळे अशा जातीयवादाचे उच्चाटन करण्यासाठी समाजानेही संघटित झाले पाहिजे, *असेही श्री. घनवट यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव येथील कै. नारायण खेडकर महाविद्यालयातील बारावीची बैठक व्यवस्था

Next Post

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Next Post
रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add