तळोदा l प्रतिनिधी
धडगाव येथील कै. नारायण खेडकर कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक 0646 येथे 21 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या इयत्ता 12 वी परीक्षेची बैठक व्यवस्था चोख करण्यात आली असून परीक्षा त्यांनी वेळेवर परीक्षा केंद्रात दाखल व्हावे व कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये असे आवाहन केंद्र संचालकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी बैठक व्यवस्था कै. एस. व्ही. ठकार विद्यालय धडगाव व उपकेंद्र पी. पी.पराडके कन्या विद्यालय धडगाव येथे करण्यात आली आहे. इतर सर्व विषयाचे पेपर कै. एस. व्ही. ठकार विद्यालयात होतील, अशी माहिती केंद्र संचालक तथा प्राचार्या उमा पाडवी यांच्याकडून देण्यात आली आहे. 12 वी बोर्डची होणाऱ्या परिक्षेसंबंधी सूचना विध्यार्थ्यांना देण्यात आल्या. विद्यार्थांनी परीक्षेत सामोरे जातांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व तणाव विरहित व कॉपी विरहित परीक्षेला सामोरे जावे असे आव्हान केंद्र संचालक उमा पाडवी यांच्याकडून करण्यात आले.
केंद्र संचालक म्हणून प्राचार्या उमा पाडवी तर उपकेंद्र संचालक म्हणून उपप्राचार्य आर.आय.वसावे व मुख्याध्यापक बी. एस. शिरसाठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. धडगाव तालुक्यातून एकूण सात कनिष्ठ महाविद्यालय केंद्र क्रमांक 0646 धडगाव केंद्रातून परीक्षा देणार असून एकूण 906 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. अशी माहिती केंद्र संचालक उमा पाडवी यांनी दिली आहे.









