नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार तालुक्यातील कोठली येथे सांसदीय संकुल विकास परियोजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्या संयुक्त अभिसरणातुन गांवातंर्गत रस्ता कॉक्रीटीकरण व जिल्हा परिषद शाळा दुरूस्ती करणे कामाचे भुमीपुजन खा. डॉ.हीना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, जयश्री वळवी,पंचायत समितीच्या सदस्या मालती गावीत,सरपंच महेद्र वळवी,उपसरपंच जगदीश पाटील,ग्रामविकास अधिकारी आर.डी.पवार,ग्रामपंचायत सदस्य किशोर पाटील,शिवदास पाटील,अशोक नायक,सागर पटेल,हिमत नायक,पंचायत समितीचे उपअभियंता अभिजीत गांगुर्डे,शाखा अभियंता हेंमत पाटील,विस्तार अधिकारी एन.जी.पाटील,अदि उपस्थित होते.यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खा. डॉ.गावीत यांनी सांगितले की केंद्र शासनाच्या विविध योजनेतून परिसरातील दहा गांवामध्ये विकास कामे करण्यात येणार आहेत.कोठली येथेही ग्रामस्थांचे आायुष्यमान आरोग्य कार्ड काढण्यासाठी शिबीर घेण्यात येणार असून त्यात सर्वानी हे आरोग्य कार्ड काढून घ्यावे यांत पांच
लाखपर्यतचा उपचार मोफत मिळणार आहे.तसेच बॅकेचे किसान क्रेडीट कार्ड साठीही अर्ज करावेत,शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन केले.









