मुंबई |

महारष्ट्रातील सत्तासंघार्षाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लाऊन असताना, आज केंद्रीय निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय दिला आहे. या निर्यानुसार आता शिंदे गटाच्या शिवसेनेला खऱ्या अर्थाने अधिकृत केल्याचा शिक्का मारला आहे.
एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का मानला जात आहे. तसेच शिवसेना नावही एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला यांना मिळाले आहे.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या गटालाच शिवसेना हे नाव मान्य केले आहे, त्याबरोबरच पक्षाचे अधिकृत असणारे धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदेंच्या शिंदेंच्या शिवसेनेला दिले आहे.









