नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार येथील तैलिक मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी मार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांची नोंदणी करण्याचे शिबिर घेण्यात आले .
त्यात ४३६ लाभार्थींनी लाभ घेतला. सदर शिबिर १९ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नोंदणी शिबिर तैलिक मंगल कार्यालयात घेण्यात आले. सदर शिबिरात ४३६ लाभार्थींनी लाभ घेतला. १३ तारखेपासून सुरू झालेले शिबिर १९ तारखेपर्यंत तैलिक मंगल कार्यालयात सुरू राहणार आहे या शिबिराचे लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरा प्रसंगी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी आ.शिरीष चौधरी, युवा नेते विक्रांत मोरे, नगरसेवक चारुदत्त कळवणकर, आनंद माळी ,संतोष वसईकर ,प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.









