Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जगातील सर्वात उंच पुतळ्यास आदर्श मराठी विद्यामंदिराची भेट

team by team
February 17, 2023
in शैक्षणिक
0
जगातील सर्वात उंच पुतळ्यास आदर्श मराठी विद्यामंदिराची भेट

नंदुरबार l  प्रतिनिधी

स्टॅच्यू ऑफ युनिटी (एकतेचे प्रतीक असलेला पुतळा) हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा गुजरात राज्यातील राजपिपला शहराजवळ नर्मदा नदीवरील सरदार सरोवर धरणासमोरील साधू बेटावर उभारलेला १८२ मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळ्यास भेट दिली .

 

 

 

येथील स्वा. सै. श्री गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्या मंदिराची ऐतिहासिक सहलीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. सहलीचे आकर्षण ठरले ते जंगल सफारी आणि प्राणी संग्रहालय. ३७५ एकर परिसरात पसरलेल्या २९ मीटर ते १८० मीटर अशा वेगवेगळ्या उंचीच्या सात स्तरांमध्ये रचना केलेल्या जंगल सफारीत शंभरहून अधिक जातीचे अकराशेहून अधिक पक्षी, प्राणी आणि पाच लाख झाडे आहेत. मोर, वाघ सिंह , ब्लॅक पँथर असे विविध प्राणी पाहण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. सहलीत १०८  चौथीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता .सरदार सरोवर धरणावर असलेली विशेष रोषणाई विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली.

 

 

 

तसेच पोईचा येथील नीलकंठ धाम स्वामी मंदिरातील महादेवाची नटराज स्वरूपातील भव्य मूर्ती व अत्यंत आकर्षक असलेल्या त्या भोवतालचा परिसर दाखविण्यात आला. सहलप्रमुख सतीश पाटील, तुषार सोनवणे, मनोज वानखेडे, मीना अहिरे हरीश चौधरी, अशोक सोनार, नितेश नाथजोगी ,विनोद बोरसे,राहुल सूर्यवंशी ,दीपिका शाह, दिपश्री माळी, शितल अजबे इत्यादी शिक्षक तसेच रंजना तांबोळी, मनीषा शिंपी उपस्थित होते. प्रमोद खैरनार, वंदना देवरे, श्री. माळी,  श्री.बागुल यांनी सहकार्य केले.

 

 

 

 

 

सहलीत सहभागी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गाणी गाऊन ,नृत्य , नकला करून मनोरंजन केले. विद्यार्थ्यांना भरभरून आनंद दिला. मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारण्याचे काम सहलीमुळे झाले याचे समाधान व्यक्त करणार्‍या प्रतिक्रिया पालकांनी लेखी स्वरूपात दिल्या.प्रा गणेश पाटील, दिनेश पाटील ,गोपाळ महाजन, गीता महाजन, संदीप पाटील, परिधी इत्यादी पालकांनी अतिशय स्तुत्य व शिस्तबद्ध बाळगोपाळांच्या आयुष्यातल्या अविस्मरणीय अशा आठवणीत राहतील अशा सहलीतील नियोजनाबद्दल शिक्षक,मुख्याध्यापिका यांचे लेखी स्वरूपात कौतुक केले. चौथीची विद्यार्थ्यांनी समता गोपाळ महाजन याने सहलीचे क्षणचित्रे ,व्हिडिओ दाखवून वृत्तांत इंग्रजीत सांगितला. सहलीहून परत आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात पालकांनी स्वागत केले. सार्वजनिक शिक्षण समितीचे चेअरमन ऍड. रमणभाई शाह, सचिव डॉ. योगेश देसाई ,मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी भदाणे यांनी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

कब मास्टर प्राथमिक प्रशिक्षण शिबिर उत्साहात

Next Post

भाजपातर्फे आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी शिबिर

Next Post
भाजपातर्फे आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी शिबिर

भाजपातर्फे आयुष्यमान भारत योजनेसाठी नोंदणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add