Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हाभरात पहिल्या टप्प्यात पाचव्या दिवशी १०४ सार्वजनिक मंडळांकडून शांततेत गणपतीचे विसर्जन

Mahesh Patil by Mahesh Patil
September 15, 2021
in सामाजिक
0
नंदुरबार जिल्हाभरात पहिल्या टप्प्यात पाचव्या दिवशी १०४ सार्वजनिक मंडळांकडून शांततेत गणपतीचे विसर्जन

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हाभरात आज पहिल्या टप्प्यात पाचव्या दिवशी १०४ सार्वजनिक मंडळांकडून शांततेत गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये यासाठी प्रशासनाने गणरायाला निरोप देतेप्रसंगी मिरवणूक काढण्यात येवू नये, असे आदेश काढण्यात आले असल्याने गणरायाची मिरवणूक न काढता शांततेत विसर्जन करण्यात आले.
नंदुरबार जिल्ह्यात यंदा ४२५ सार्वजनिक मंडळ, २३२ खासगी गणपती मंडळ तर १०८ एक गाव एक गणपती अशा एकूण ७६५ मंडळांकडून गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. दरम्यान, आज पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १०४ सार्वजनिक मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. यामध्ये नंदुरबार शहरातील १७, उपनगर हद्दीतील १६ तर शहाद्यातील १३ यासह विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून गणरायाला निरोप देण्यात आला. गणरायाला निरोप देतेप्रसंगी मिरवणूक काढण्यात येवू नये, गर्दी होणार नाही याची दक्षता मंडळांनी घेणे गरजेचे आहे. तसेच विसर्जनाप्रसंगी उपस्थित नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सूचना पोलिस प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू यासाठी खबरदारी घेण्याच्याही सूचना पोलिस दलातर्फे देण्यात आल्या होत्या.त्यानुसार गणेश मंडळांनी गणरायाची मिरवणूक न काढता शांततेत विसर्जन केले.


पोलीसांचा तगडा बंदोबस्त
नंदुरबार जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने विसर्जनाप्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये एक पोलिस अधिक्षक, एक अप्पर पोलिस अधिक्षक, चार पोलिस उपअधिक्षक, वीस पोलिस निरीक्षक, ७४ सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच उपनिरीक्षक, ८५५ पुरुष पोलिस कर्मचारी, १४१ महिला पोलिस कर्मचारी, ५०० पुरुष होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, सात स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरपी व क्यूआरटी प्लाटून तसेच एक एसआरपी कंपनी असा पोलिस बंदोबस्त असणार आहे.
नंदुरबारात तीन कृत्रिम तलाव
गणेश मुर्ती विसर्जनाकरीता नंदुरबार पालिकेतर्फे  वैशाली नगर २ येथील मोकळ्या जागेत, सी.बी.पेट्रोल पंपाच्यामागे महिला जीमजवळ व गजानन महाराज मंदिराजवळ पाताळगंगा नदी पात्रात कृत्रिम तलाव तयार करण्यात आले होते. नागरिकांनी गणेश मुर्तींचे विसर्जन या तीन ठिकाणी केले. तसेच निर्माल्य संकलनासाठी त्या ठिकाणी कुंड्यां ठेवण्यात आल्या होत्या. तसेच आज नंदुरबार नगर परिषदेमार्फत सी.बी.पेट्रोल पंपाच्यामागे, गजानन महाराज मंदिराजवळ व वैशाली मोकळ्या जागेवर तसेच सोनी विहिरजवळ मुर्ती संकलनासाठी वाहन ठेवण्यात आले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील चार आरोपींना सात वर्षांचा सश्रम कारावास व १ ९ लाख रुपये दंडाची शिक्षा

Next Post

योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

Next Post

योगासन क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

June 4, 2023
तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

June 4, 2023
बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

June 4, 2023
शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

June 4, 2023
शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

June 4, 2023
महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ  सत्यशोधक सभेचे निवेदन

महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ सत्यशोधक सभेचे निवेदन

June 4, 2023

एकूण वाचक

  • 9,454 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group