नंदुरबार शहरातील डी.सी. डेव्हलपर्सच्या कार्यालयात पिस्तुलचा धाक दाखवून दोन ठिकाणी दरोडा टाकून १९ लाख ६९ हजार रुपये जबरीने लंपास करणार्या चार जणांना न्यायालयाने सात वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व १९ लाख रुपये दंड ठोठावला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१९ ऑगस्ट २०२० रोजी नंदुरबार शहरातील गणपती मंदिराजवळील देवेंद्र चंदनमल जैन यांच्या डी.सी.डेव्हलपर्सच्या कार्यालयात सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी प्रवेश करून दुकानातील नोकराला पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण करून, नोकराचे हातपाय बांधून ड्रॉवरमधील १५ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम तसेच विक्रमसिंग राजपूत यांच्या घरून ४ लाख रुपये अशी एकूण १९ लाख ६९ हजार रुपयांची रोकड जबरीने चोरून नेली होती. याप्रकरणी देवेंद्र चंदनमल जैन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कलम ३/२५ , सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम ३७ (१ ) ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सदरचा गुन्हा हा जैन यांच्या दुकानावर काम करणारा उमेदसिंग भवानीसिंग राजपूत याने आपल्या सहकार्यांसह केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यावरून उमेदसिंग भवानीसिंग राजपूत, रा.मोहकल, ता.सिवनी, जि.बाडमेर, भगवतसिंग उर्फ भगू जोगसिंग राजपूत, रा.साकलाकी दाहनी, ता. समदडी, जि.बाडमेर, उत्तम जेसाराम सुंदेशा ऊर्फ माळी, रा.भिनमाल, ता.भिनमाल,जि.जालोर, राजू माळी उर्फ हरसनाराम सुजानराम चौधरी, रा. निबवास, ता.भिनमाल, जि.जालोर यांना अटक करण्यात आली होती.अटकेपासून गुन्ह्यातील आरोपी हे मध्यवर्ती जिल्हा कारागृह नंदुरबार येथे आहेत. सदर गुन्हयाच्या तपासात गुन्हा करतांना वापरलेली हत्यारे लोखंडी टॉमी, आरोपींचे कपडे, सेलो टेप, तांत्रिक पुरावे व आरोपीतांकडून एकुण ४ लाख ३० हजार रुपये जप्त करण्यात आले होते. गुन्हयाचा तपास पूर्ण करून सबळ पुराव्यांसह दोषारोप पत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचे कामकाज मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.जी. चव्हाण यांच्या न्यायालयात चालून आज दि.१४ सप्टेंबर रोजी न्यायालयाने गुन्ह्यातील चारही आरोपींना ७ वर्षाची सश्रम कारावासाची व त्यासोबत ४ लाख ८४ हजार ७५० रुपयांच्या प्रत्येकी दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास २१ महिन्याचा सश्रम कारावास आरोपींना भोगावा लागणार आहे. अशाप्रकारे एकुण १९ लाख ३९ हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर दंड रक्कमपैकी १५ लाख ३९ हजार रुपये फिर्यादी देवेंद्र जैन यांना आणि ४ लाख रुपये साक्षीदार विक्रमसिंग राजपूत यांना नुकसान भरपाई स्वरुपात द्यावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सदर गुन्हयाच्या तपासात जप्त करण्यात आलेली एकुण ४ लाख ३० हजार रुपये ही रक्कम फिर्यादी यांना अपील कालावधीनंतर देण्यात यावी असे आदेशात नमुद केले आहे . गुन्ह्याचा तपास नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले व पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत यांनी केला होता. सरकारी अभियोक्ता म्हणून ऍड. सुनिल पाडवी यांनी कामकाज पाहिले. पैरवी अंमलदार म्हणून पोना गिरीश पाटील, पोना मनोज साळुंके यांनी कामकाज पाहिले.